सीमावर्ती भागातील नव मतदार विद्यार्थी नोंदणी मध्ये मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालय अव्वल…
नवमतदार नोंदणी अभियान

सीमावर्ती भागातील नव मतदार विद्यार्थी नोंदणी मध्ये मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालय अव्वल…

अक्कलकोट: सीमावर्ती भागातील महाविद्यालय स्तरावर 18 वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदार विद्यार्थ्यांच्या नोंदणी अभियानात मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयाने अव्वल स्थान संपादन केले आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मा श्रीकांत देशपांडे व सोलापूरचे जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतेच महाविदयालयास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे. सन्मान स्वीकारताना प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे व नोडल ऑफिसर प्रा. राजशेखर पवार हे उपस्थित होते.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये मताधिकार, लोकशाही संबंधी केलेली जागृती, यासाठी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, तसेच नव मतदार नोंदणीत उत्कृष्ट कार्य केल्यामुळे मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व संपर्क अधिकारी व सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी,संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालक मल्लिनाथ मसूती, सौ पूनम कोकळगी, सौ रुपाली शहा,मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी अभिनंदन केले आहे.
