गावगाथा

*संत चोखामेळा अध्यासन प्रमुखपदी प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांची निवड*

निवड नियुक्ती

*संत चोखामेळा अध्यासन प्रमुखपदी प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांची निवड*

HTML img Tag Simply Easy Learning    

संत चोखामेळा महाराज व त्यांच्या परिवारातील संत मंडळी यांच्या जीवन कार्यावर संशोधन , साहित्य निर्मिती व विचार प्रसार कार्य आदि उद्देश समोर ठेवून कार्यरत असलेल्या ‘ संत चोखामेळा अध्यासन केंद्र ‘ च्या प्रमुखपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक
प्राचार्य डॉ. रामदास चवरे ( अमरावती ) यांची निवड करण्यात आली . संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे इ… राज्यातील प्रमुख विद्यापीठामधील मराठी अभ्यास मंडळ सदस्य , मराठी प्राध्यापक परिषद अध्यक्ष ,पीएच. डी. मार्गदर्शक , प्राध्यापक , प्राचार्य अशा जबाबदा-या पार पाडल्या आहेत . त्यांनी जगभरात शेकडो व्याख्याने दिलेली आहेत . अनेक नामांकित पुरस्काराने सन्मानित संत साहित्याचे अभ्यासक असलेले प्राचार्य चवरे साहित्यिक व समीक्षक म्हणून ही ख्यातकीर्त आहेत . महाराष्ट्र , गुजरात ,कर्नाटक राज्यातील बहुतांश विद्यापीठ मधून त्यांचे साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट आहे . त्यांच्या निवडीबद्दल राज्यभरातील अभ्यासक व वारकरी संप्रदायमधून त्यांचे अभिनंदन होत आहे .

HTML img Tag Simply Easy Learning    

संत चोखामेळा अध्यासन केंद्र वृंदावन फाऊंडेशन व सहयोगी संस्था यांच्या वतीने चालवले जाते . अध्यासनाच्या वतीने आजवर
संत चोखामेळा व परिवार सार्थ अभंग गाथा( संपादक
प्रा. डॉ. ओम श्रीश दत्तोपासक ) संत चोखामेळा व परिवार चरित्र व अभंगगाथा ( संपादक सचिन पाटील )
पारायण प्रत , संत सोयराबाई व्यक्तित्व आणि कर्तुत्व ( सचिन पाटील – डॉ. संदीप सांगळे ) , संत चोखामेळा चरित्र ( दीपक जेवणे ) इ ग्रंथ निर्मितीसोबतच , संत चोखामेळा साहित्य संमेलन , संत चोखामेळा समता पुरस्कार असे महत उपक्रम सुरु आहेत . यामध्ये संत चोखोबा व परिवार यांच्या जीवन कार्य साहित्य संबंधित संशोधन व प्रचार प्रसार कार्य चालू असते. वारकरी संप्रदायाने सांगितलेल्या समता ,बंधुता आणि मानवता या मुल्यांच्या उत्कर्ष आणि संवर्धन कार्याकरिता मागील सात वर्षांपासून महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यातून १७५० किलोमीटर अंतर प्रबोधन प्रवास करणारी ‘ चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची ‘ ही समता वारी काढली जाते .
वृंदावन फाऊंडेशन मुख्य विश्वस्त मंडळ यांच्या संस्थापक निमंत्रक मा सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली . तसेच संत चोखामेळा अध्यासनाच्या आजवरच्या वाटचालीत यशस्वीपणे ज्यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल केली त्या मावळत्या अध्यक्षा प्राचार्या उल्काताई चंदनशिवे यांच्या आभाराचा ठराव करण्यात आला .

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button