श्री स्वामी समर्थ रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न.
महेश मालक इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत शिबिराचा ६२ रुग्णांनी घेतला लाभ.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, )
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष महेश मालक इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.स्वप्ना हिप्परगी, डॉ.स्वप्नील हिप्परगी, डॉ.रोहित कुंभार, डॉ.नम्रता मोरे, डॉ.राजेश मलंग यांच्या सेवेतून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचालित मैंदर्गी रोड वरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात संपन्न झाले अशी माहिती युवा नेतृत्व प्रथमेश महेश इंगळे यांनी दिली. या प्रसंगी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी
या शिबिरात मोफत रक्त तपासणी, मोफत औषधे यासह एकूण ६२ रुग्ण सहभागी होवून लाभ घेतला आहे. त्यापैकी २१ रूग्णांना सांगली येथील जीवनदीप नेत्र रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविले आहे असे सांगून तालुक्यातील गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतल्याबद्दल गरजू रुग्णांचे आभार मानले. मंदीर समितीचे व श्री स्वामी समर्थ रुग्णालयाचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व संबंधीत वैद्यकीय स्टाफच्या उपस्थितीत शिबीराच्या प्रारंभी प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करून या शिबीराचे शुभारंभ करण्यात आले. सदरहू शिबीर यशस्वी होण्याकरीता बसवराज बामगोंडा, सागर प्याटी, अभिषेक माडीकर, मनोज काटगाव,नितीन साळुंके, श्रीपाद कोरे, प्रकाश तुप्पद, सविता कोष्टी, चित्तरंजन अगरथडे सर, विजय मोरे, मनोज काटगांव, रवि मलवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

(चौकट – देवस्थानचे माजी चेअरमन व स्वामी सेवक तथा महेश मालक इंगळे यांचे वडील कै.कल्याणराव इंगळे यांनी
रुग्णसेवा म्हणजे स्वामी सेवा हा उपक्रम गेल्या ४० वर्षांपूर्वी सुरू केला आहे. ती सेवा पुढे महेश मालक इंगळे यांनी अखंडपणे जोपासली आहे. वर्षभरात अनेक आरोग्य शिबिरे आयोजित व यशस्वी करून महेश मालक यांनी जनतेचे आरोग्य जपणारे आधारवड बनले आहेत महेश मालकांची ही आरोग्य सेवा भविष्यात अनेक वर्षे त्यांच्या हातून घडत राहो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या वतीने शुभेच्छा – डॉ.स्वप्नील हिप्परगी – नेत्ररोग तज्ञ सोलापूर)
फोटो ओळ – श्री स्वामी समर्थ रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शुभारंभ प्रसंगी प्रथमेश इंगळे व अन्य तर दुसऱ्या छायाचित्रात रुग्णांची नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया संबंधीत औषधोपचार प्रसंगी डॉ.स्वप्ना हिप्परगी, डॉ.स्वप्नील हिप्परगी, डॉ.रोहित कुंभार, डॉ.नम्रता मोरे, डॉ.राजेश मलंग आदी दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!