श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” उत्साहात प्रस्थान — राज्यभरातील भक्तांत आनंदाची लहर
“अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त…! सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!!” अशा ಘणघणीत जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची भव्य श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा सुरवात

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” उत्साहात प्रस्थान — राज्यभरातील भक्तांत आनंदाची लहर
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
“अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त…! सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!!” अशा ಘणघणीत जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची भव्य श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून रविवारी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली.
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या आध्यात्मिक सोहळ्याची सुरुवात झाली.

२९ वे वर्ष — दैवी परिक्रमेची गौरवशाली परंपरा
श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा गेली २८ वर्षे अखंडपणे काढण्यात येत असून, यंदाचे वर्ष हे या परिक्रमेचे २९ वे वर्ष आहे.
शुभारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, देवस्थानचे मुख्य पुरोहित प.पू. मोहनराव गोविंदराव पुजारी यांचे चिरंजीव मंदार पुजारी आणि श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी प.पू. अण्णू महाराज पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ पादुकांच्या पूजनाने झाला.
अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी न्यासाच्या महानैवद्याबरोबर श्रींच्या पादुकांची पूजा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात संपन्न केली.
अक्कलकोटातून सोहाळ्याचा भव्य प्रस्थान
पालखी पूजनानंतर महाप्रसादालय, श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर, श्री भवानी माता मंदिर येथे धार्मिक विधी होऊन पालखी अन्नछत्रातून राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ, सोन्यामारुती चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड, कारंजा चौक मार्गे बुधवार पेठेतील समाधी मठात आरती करून पुढे श्री मल्लिकार्जुन मंदिर, शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री खंडोबा मंदिर येथे आरती झाल्यानंतर पालखी सोलापूरकडे प्रस्थान झाली.

१६ नोव्हेंबर रोजी पालखी मंगळवेढा तालुक्यातील सोहाळे येथे मुक्काम करणार असून, १८ नोव्हेंबर रोजी ती सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
सोहळ्यात मान्यवर व भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती
या सोहळ्यास संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त तसेच मोठ्या प्रमाणात सेवेकरी, वारकरी, कर्मचारी व भाविक उपस्थित होते.
चौकट
श्री सेवा : भक्तांसाठी दैवी भेट
स्वामी भक्तांना त्यांच्या गावी बसून श्री स्वामींच्या पादुकांचे दर्शन व सेवा करता यावी म्हणून ही परिक्रमा काढली जाते. मूळ स्थानी अक्कलकोटला येणे अनेकांना शक्य नसते, अशा भक्तांना श्री स्वामी स्वतः त्यांच्या घरापर्यंत दर्शन देतात, हीच या परिक्रमेची मुख्य भावना.
अपूर्व संधी : भक्तिभाव जागवणारा सोहळा
स्वामी समर्थ महाराजांची भक्ती, त्यांचे साधुत्व आणि त्यांच्या कृपेचे अनुभव गेली सव्वाशे वर्षे भारतभर पसरले आहेत. पालखी आपल्या गावी आल्याने भक्तांना तन-मन-धनाने सेवेसाठी अपूर्व संधी उपलब्ध होत आहे.
न्यासाकडून सर्वोतोपरी सहकार्य
न्यास दैनंदिन महाप्रसाद, सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम, क्रीडा, आरोग्य, आपत्ती मदत असे विविध उपक्रम राबवितो. शासनाच्या अनेक उपक्रमांनाही न्यास वेळोवेळी सहकार्य करत असतो.
भक्तांच्या सेवेर्थ — भव्य महाप्रसादगृहाची उभारणी
न्यासाच्या परिसरात
- यात्री निवास,
- यात्री भुवन,
- अतिथी निवास
यांसह अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
लवकरच ५ मजली वातानुकुलीत भव्य महाप्रसादगृह,
- १,०९,३९७ चौ. फु. क्षेत्र
- ५१ फुटी स्वामींची मूर्ती
- एकावेळी २,००० भाविकांची भोजन क्षमता
- ५,००० भाविक प्रतीक्षा व्यवस्था
६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित.
तसेच परिसरात
श्री शमी विघ्नेश मंदिर, श्री भवानी माता मंदिर, कारंजा, शिवस्मारक, जिम, वाहनतळ, बालोध्यान, प्रदर्शन हॉल, अग्निशामक, रुग्णवाहिका, एसटी कर्मचारी निवास व्यवस्था, सौर उर्जा प्रकल्प आदी सुविधा कार्यरत आहेत.
२०२५-२६ मध्ये ८ महिने पालखी परिक्रमा
या परिक्रमेचा विस्तार महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सह अनेक राज्यांत असून, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, विदर्भातील जिल्हे, तसेच मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ व परदेशातूनही मागणी येते.
परिक्रमा १५ जुलै २०२५ रोजी अक्कलकोट येथे विसावा घेणार आहे.
अधिक माहितीसाठी :
मुख्य संयोजक संतोष भोसले — ९८२२८१०९६६ / ८५५८८५५६७५.



