गावगाथाठळक बातम्या

Akkalkot politics : एखादी व्यक्ती पक्ष सोडून गेल्याने पक्ष संपत नाही, आम्ही नव्या जोमाने पुन्हा पक्ष उभारू ; डॉ सुवर्णा मलगोंडा यांचा उद्गार…

अक्कलकोट ( प्रतिनिधी) : एखादी व्यक्ती पक्षातून गेली म्हणून पक्ष संपत नाही, आम्ही नव्याने आणि जोमाने तालुक्यात काॅंग्रेस पक्ष उभा करु असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा यांनी पत्रकार परिषदेत केले.

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल विधानसभेला काॅग्रेसपक्षाला सुमारे एक लाख मतदान झाले ही काॅग्रसची ताकद विसरता येणार नाही स्वातंत्र्या नंतर आज पर्यंत ११वेळा काॅग्रेसपक्षाला यश मिळाले आहे.

 

जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण जाधव म्हणाले, काॅग्रेसपक्षाने अनेक वादळे पचवली आहेत लोक येतात जातात पक्ष संपत नाही संपणार नाही.मी पक्षातच राहणार आहे.सर्व प्रथम मी भूमिका जाहीर केली होती माझ्या भूमिकेचे स्वागत खासदार प्रणिती शिंदे यांनी केले असे सांगितले.

डॉ सुवर्णा मलगोंड म्हणाल्या काॅग्रेसपक्षाने मला नगराध्यक्ष केले महिला जिल्हाध्यक्षा केले माझी आई श्रीमती पार्वती मलगोंडा यांना मंत्रिपद दिले याची जाणीव आहे राजकीय वारे फिरले म्हणून मी बदलणार नाही. काॅग्रेसला वार्यावर सोडणार नाही.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील काँग्रेसची घडी बसवणार.

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील म्हणाले. आगामी काळात शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बैठक घेण्यात येणार आहे . आता काॅग्रेस संकटात असली तरी भविष्यकाळ उज्ज्वल आहे.तीकडे गेलेले काॅग्रसजन आमच्या संपर्कात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button