Akkalkot: कर्नाटकात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना तर अक्कलकोट मध्ये पडसाद

अक्कलकोट (प्रतिनिधी) -१२ व्या शतकातील जगातील पहिले संसद स्थापना करणारे , क्रांतीसुर्य, जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे काही समाजकटकांनी विटंबना केली आहे . ही घटना कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात घडली आहे तर या घटनेचे पडसाद अक्ककोट मध्ये उमटले आहे.

शहरामध्ये बसस्थानक येथे निषेध व निवेदन देण्यासाठी मोठा सर्व समाजाचे प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी वर्ग उपस्थित होते .या प्रसंगी मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली खाली नोदविण्यात आले निवेदन तहसीलदार मगर यांनी घेतले असून लवकरच आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी राहुल वाडे, रुद्रय्या स्वामी , शिवराज जकापुरे, शिवशंकर स्वामी, धर्मा गुंजले,आनंद बुकानुरे,प्रशांत लोकापुरे, ऋषी लोणारी,धनराज पााटील, सत्यजित लोके, प्रीतीश किलजे, सौरभ हळके, प्रसन्न गवंडी, रोहित देशमख,रोहन देशमुख, मल्लिनाथ खुबा, सिद्धाराम माळी, निखिल पाटील,सुनील पाटील, अशोक जाधव, आदर्श पडणुरे, सिद्धाराम मशेट्टी, शरणू कापसे, दीपक रोडगे,शेखर वाले,संतोष स्वामी,मदन राठोड, नागू होलीकटी ,सचिन पाटील,राज मद्रीकर,अनिल माने,अनिल नागणसुर, सिद्धाराम पाटील,शरण नडगेरी , बसवराज पटणे आदी उपस्थित होते.
