गावगाथा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सलग तिसऱ्यांदा विजेतेपद…
कुलगुरू चषक : शिवाजी विद्यापीठ उपविजेते तर मराठवाडा विद्यापीठ तृतीय

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सलग तिसऱ्यांदा विजेतेपद…
कुलगुरू चषक : शिवाजी विद्यापीठ उपविजेते तर मराठवाडा विद्यापीठ तृतीय
सोलापूर, दि. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून आयोजित महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठ शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्यासाठीच्या कुलगुरू चपक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सलग तिसऱ्यांदा पटकाविले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
त्याआधी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सकाळच्या सत्रात तिसऱ्या स्थानासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संघाचा सामना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी आंतरविद्यापीठझाला. त्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाने ११६ धावांनी विजय नोंदवत तिसरे स्थान प्राप्त केले. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार कार्तिक चव्हाणला देण्यात आला. दुपारच्या अंतिम सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरवर ६ गड्यांनी विजय मिळवत मानाचा कुलगुरू चषक सलग तिसऱ्यांदा
पटकावला. अंतिम सामन्यात मनीष गायकवाडला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ही स्पर्धा कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्या नियोजनाखाली पार पडली. स्पर्धेचे बक्षीस वितरण सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, सोलापूर महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र संचालक डॉ. राजीव मराठे, उच्चशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. अजयकुमार जाधव, जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्स यांच्या हस्ते करण्यात आले. अंतिम सामन्यासाठी सोहेल
विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला जिंकला चषक

१० फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन असून त्याच्या पूर्वसंध्येला त्यांच्या संघाने चषक जिंकला हे विशेष. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ नाशिकच्या पुष्कर तहऱ्हाळ याला, सर्वोत्तम फलंदाज म्हणून पुण्याच्या मनीष गायकवाड याला गौरविण्यात आले.
शेख, महेश सोनवणे यांनी पंच तर गुणलेखक म्हणून मजहर मंगोली यांनी काम पाहिले. शंकर पवार यांनी समालोचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंबादास भासके यांनी केले. तर आभार डॉ. उपकुलसचिव उमराव मेटकरी यांनी मानले.



