झेडपी अध्यक्षपद अक्कलकोटला मिळणार? शांभवी कल्याणशेट्टींच्या नावाची जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा…
अक्कलकोट : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी चपळगाव गटातून या निवडणूक रिंगणात होत्या. त्या ७ हजार १५८ विक्रमी मताने निवडून आल्याने भाजपकडून त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
चपळगाव जिल्हा परिषद गट हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो. या गटातून पूर्वी स्व. पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी तळमळीने व आत्मीयतेने सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. गतवेळेस या जिल्हा परिषद गटातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या काकू मंगलताई कल्याणशेट्टी यांनी पारंपरिक विरोधक असलेल्या भरमशेट्टी यांचा पराभव करून विजयी झाल्या होत्या. मंगलताई कल्याणशेट्टी यांनीदेखील मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी या
मूलभूत गरजांकडे जातीयतेने लक्ष देऊन सोडविण्याचे प्रयत्न केले. म्हणून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे गावातील अडीअडचणी, शेतकऱ्यांचा प्रश्न, शालेय विद्यार्थ्यांचे अडीअडचणी, पाणंद रस्ते, विकासाकरिता निधी असे अनेक प्रश्न घेऊन येत असतात.
आता नुकतेच चपळगाव जिल्हा परिषद गटातून ओबीसी या प्रवर्गातून शांभवी कल्याणशेट्टी यांनी सुजाता भरमशेट्टी यांच्यावर ७ हजार १५८ मतांनी
विविध गावांत मतांची आघाडी
चपळगाव जिल्हा परिषद मतदार संघातील आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या स्वतःच्या हन्नूर गावातून शांभवी कल्याण शेट्टी यांना १०२३ मताधिक्य, किणी ७९९, पिपळगाव वाडी ५७९, दर्शना ५१८, आरळी ५०१, कुरनूर ५२८, किडेवाडी ३६६, बऱ्हाणपूर ३५६, पिठापूर ३०६, बोरेगाव ३५२, धनेगाव ३३८ असे १९ गावांमधून ७१५८ मतांची आघाडी मिळाली आहे.
विजय संपादन करून भाजपचा बालेकिल्ला अबाधित ठेवला आहे. मतदार संघातील सर्वच निवडणुकीमध्ये त्यांचा सहभाग असतो. यामुळे भारतीय
जनता पक्षाने शांभवी कल्याणशेट्टी यांना जिल्हा परिषद अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!