खैराट शाळेत मेहंदी स्पर्धा व प्रात्यक्षिक उपक्रम उत्साहात संपन्न
खैराट (ता. अक्कलकोट) :
जि. प. प्राथमिक शाळा, खैराट (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथे विद्यार्थिनींसाठी नाविन्यपूर्ण व कलाविकासाला चालना देणारा मेहंदी स्पर्धा व प्रात्यक्षिक उपक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला. रेखा सोनकवडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थिनींना मेहंदी कलेचे प्रशिक्षण व अनुभव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या मेहंदी स्पर्धेत गौरी गायकवाड, स्मिता घुगरे, अंकिता जमादार, सुप्रिया तोळनुरे, अंकिता घुगरे, मिजबा मुर्डी, इकरा मुर्डी, अक्षता घुगरे, इकरा बिराजदार, दिव्या मायाचारी, शिवानी जाधव, अल्फीजा शेख, रूक्सार बक्षी, बीबनबी बिराजदार, ईश्वरी पाटील, साक्षी रोडगे, अनम पटेल, गायत्री गायकवाड, खुशी गायकवाड, निर्जला फुलारी, अलीना शेख, संजीवनी तोळनुरे, संचिता तोळनुरे, अर्पिता जमादार, भक्ती जमादार, करुणा आमरे, विद्याश्री थंबद, श्रावणी लकशेट्टी, मल्लम्मा तोळनुरे, महेशबिन बिराजदार, शिका पटेल, आयेशा, स्वाती तोळनुरे, जारा बक्षी, बिराजदार आदी विद्यार्थिनींनी सहभाग घेत आनंद व्यक्त केला.
स्पर्धेत अंकिता जमादार हिने प्रथम, स्मिता घुगरे हिने द्वितीय तर गौरी गायकवाड हिने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनी अनुक्रमे अर्पिता जमादार, श्रावणी लकशेट्टी व दिव्या मायाचारी यांच्या हातांवर आकर्षक व नाजूक मेहंदी रचना साकारल्या.
यावेळी बोलताना रेखा सोनकवडे म्हणाल्या, “प्रत्येकाच्या अंगी कोणती ना कोणती कला असते. ती आत्मसात करून जोपासणे व त्यातून आनंद घेणे आवश्यक आहे. घरी मेहंदी काढणे वेगळे, पण शाळेत एकत्र बसून, एकमेकींच्या हातांचे निरीक्षण करून प्रतिक्रिया देत स्पर्धेचा अनुभव घेणे हे क्षण आयुष्यभर मनात घर करून राहतात.”
फिरोजा नदाफ यांनी विद्यार्थिनींना मेहंदी काढण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. बाळूसिंग रजपूत व सुनील होनाजे यांनी स्पर्धेचे निरीक्षण करून निकाल जाहीर केला. केंद्रप्रमुख श्रीहरी करपे यांनी जि. प. खैराट शाळेत राबविण्यात येणाऱ्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!