गावगाथा

महेश इंगळे यांची स्वामी सेवेतील निष्ठा व तपश्चर्या आध्यात्मिक सेवकांना प्रेरणादायी – पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी

पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी व कुटूंबियांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व अन्य दिसत आहेत.

महेश इंगळे यांची स्वामी सेवेतील निष्ठा व तपश्चर्या आध्यात्मिक सेवकांना प्रेरणादायी –
पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी

(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.१८/०६/२०२५)
दत्त सांप्रदाय मध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांनी ब्रम्हांडनायक म्हणून आपल्या अवताराची प्रचिती भाविकांना दिली आहे. अशा ब्रम्हांडनायकाच्या दरबारी सेवा करणे हे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व कुटूंबियांचे परमभाग्य आहे.
या परम भाग्याचे ऋणी राहून महेश इंगळे यांनीही समर्पित जीवनशैली अंगीकारून स्वामी सेवेस जीवन समर्पण केले आहे. एक स्वामी भक्त या नात्याने मी जेव्हा जेव्हा स्वामी दर्शनास येतो तेव्हा तेव्हा महेश इंगळे यांच्या सेवा कार्याच्या या बाबी विविध माध्यमातून माझ्या निदर्शनास येत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खूप मोठी विनयशीलता व तपश्चर्या ठासून भरलेली आहे. ही महेश इंगळे यांची स्वामी सेवेतील निष्ठा व तपश्चर्या आध्यात्मिक क्षेत्रातील सेवकांना प्रेरणादायी असल्याचे मनोगत पुणे-कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कॄपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. याप्रसंगी पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी बोलत होते. पुढे बोलताना महानिरीक्षक फुलारी यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे पोलीस प्रशासनास नेहमीच सहकार्य आहे, स्वामी महाराजांच्या सेवेच्या हेतूने पोलीस प्रशासनाकडून
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीस आपण नेहमीच सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे मनोगतही व्यक्त केले.
यावेळी अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, नॉर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे,
मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, पांडुरंग पाटील, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, दर्शन घाटगे व अन्य उपस्थित होते.

फोटो ओळ – पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी व कुटूंबियांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button