श्रुतिका वरनाळे हिला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव

अक्कलकोट : (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील कन्या कु. श्रुतिका दत्तात्रय वरनाळे हिला लातूर जिल्ह्यातील आलमला येथील Shivlingeshwar College of Pharmacy येथे ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सध्या बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या श्रुतिकाने मागील तीन वर्षांपासून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावत सातत्यपूर्ण गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संशोधन, कला आणि क्रीडा क्षेत्रातही तिने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांगीण प्रगती साध्य केली आहे.
Swami Ramanand Teerth Marathwada University यांच्या युवक महोत्सवात तिने महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करत आपल्या कौशल्याची छाप पाडली. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वेश्वर धाराशिवे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामागे प्रा. शिवशंकर वागदरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले जाते. श्रुतिकाच्या या यशाबद्दल अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, नगरसेवक महेश हिंडोळे, ज्येष्ठ समाजसेवक दयानंद बिडवे, महाराष्ट्र प्रदेश भाजप सदस्य शिवशरण जोजन, रवीकुमार वरनाळे, दत्तात्रय वरनाळे, ललिता वरनाळे आदींनी शुभेच्छा दिल्या.
श्रुतिका वरनाळे हिच्या या यशामुळे वागदरीसह अक्कलकोट तालुक्याचा शैक्षणिक गौरव उंचावला असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!