श्री वटवृक्ष देवस्थान मधील धार्मिक
कार्यक्रम सर्वधर्म समभावाचे प्रतिक – अस्मिताताई गायकवाड.
श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर
शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपनेत्या
अस्मिताताई गायकवाड यांचे मनोगत.
(श्रीशैल गवंडी,अ.कोट, दि.१८/०२/२६) – श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान आहे. अशा या जागृत स्थानी मंदीर समितीच्या वतीने विविध जाती धर्मातील नागरीक भाविकांना धार्मिक कार्यक्रमातून आपली कला सादर करण्यासाठी येथील कै. कल्याणराव इंगळे सभा मंडपातील व्यासपीठ नेहमीच उपलब्ध असते.
या माध्यमातून अनेक जाती धर्माचे लोक
स्वामींच्या या वटवृक्ष मंदिरात वेळोवेळी धार्मिक कार्यक्रमांची सेवा देत असतात.
यानिमीत्ताने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील संपन्न होणारे धार्मिक कार्यक्रम म्हणजे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असल्याचे मनोगत
सोलापूर येथील शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र व प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी उपनेत्या अस्मिताताई गायकवाड बोलत होत्या. पुढे बोलताना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी नगरसेवक महेश इंगळे यांच्या या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची ही सेवा उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत व्यक्त करून सर्व स्वामी भक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, महेश मस्कले आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांचा देवस्थान मध्ये सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, श्रीपाद सरदेशमुख व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!