
HTML img Tag
वागदरी (प्रतिनिधी): वागदरी गावातील पाणंद रस्ते मंजूर करण्यात यावेत, या मागणीसाठी वागदरी ग्रामपंचायत प्रशासक शिवानंद घोळसगाव यांनी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांना नुकतेच एक निवेदन दिले.
मंत्री गोगावले हे अक्कलकोट दौऱ्यावर आले असताना प्रशासक घोळसगाव यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हे यासंदर्भात पत्र सुपूर्द केले.गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शेतात जाण्यासाठी पाणंद रस्त्यांची अत्यंत गरज आहे. अनेक वर्षांपासून हे रस्ते दुरवस्थेत असल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांचे मोठे हाल होतात. तसेच हक्काचा रस्ता नसल्यामुळे पिकांची वाहतूक करणे कठीण जाते. हीच अडचण दूर करण्यासाठी ‘मातोश्री पाणंद रस्ते योजने’अंतर्गत गावातील रस्त्यांना मंजुरी द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी निवेदनाचा सकारात्मक विचार करून वागदरी गावातील पाणंद रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे सह शाहाबुद्दीन शेख, अक्क्लककोट नाभिक संघटना तालुका अध्यक्ष शिवशरणपा सुरवसे सह आदि मान्यवर उपस्थित आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!