गावगाथा

महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा मुंबई जिल्हा समितीच्या अध्यक्षपदी सतीश नारायण आप्पा आवटे यांची एकमताने निवड

निवड नियुक्ती

महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा मुंबई जिल्हा समितीच्या अध्यक्षपदी सतीश नारायण आप्पा आवटे यांची एकमताने निवड
मुंबई, दि. २९ जुलै : महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा मुंबई जिल्हा समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अंधेरी येथील सुयोग भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या बैठकीस महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा प्रदेश समितीचे अध्यक्ष प्रा. रमेश आवटे, प्रदेश समितीचे सरचिटणीस बाळासाहेब होनराव तसेच प्रदेश समितीचे उपाध्यक्ष शिवशंकर लातूरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीदरम्यान उपस्थित सभासदांच्या एकमताने श्री. सतीश नारायण आप्पा आवटे यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा मुंबई जिल्हा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत अभिनंदन केले.
नवनियुक्त अध्यक्ष श्री. सतीश नारायण आप्पा आवटे यांनी आपल्या निवडीबद्दल सर्व सभासदांचे आभार मानून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, संघटन बळकट करण्यासाठी आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
या बैठकीस श्री. संजय विभुते, श्री. मोहनराव आंधळकर, श्री. गणेश तोडकर, श्री. शिवानंद दोड्डाणंवार, श्री. श्रीकांत लिंगे यांच्यासह अनेक समाजबांधव व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त अध्यक्ष श्री. सतीश नारायण आप्पा आवटे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button