गावगाथा

वरिष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांची पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

निवड नियुक्ती

वरिष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांची पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती
महेश गायकवाड
सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ आणि वरिष्ठ पत्रकार व दैनिक समर्थ गावकरी चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी व सुयश मीडिया ग्रुपचे ब्युरो चिफ आणि साप्ताहिक चैत्यभूमी चे संपादक महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटना असलेल्या पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटना पत्रकार हल्ला विरोधी समिती वर प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड सोलापूर येथील वरिष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांची झाली आहे
वरीष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांच्या ४२ वर्षातील निर्भीड रोखठोक आणि बेधडक पत्रकारितेचे हे यश मानले जात आहे.
त्यांच्या निवडीचे सर्वत्र जोरदार स्वागत केले जात आहे.
पत्रकार हल्ला विरोधी समिती चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय निलेश सोमाणी साहेब, राज्य संघटक माननीय संजय भोकरे साहेब, आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस माननीय विश्वासराव आरोटे साहेब यांनी महेश गायकवाड यांच्या उत्तुंग पत्रकारितेची दखल घेत पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.
वरिष्ठ पत्रकार महेश गायकवाड हे गेल्या ४२ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असुन त्यांनी आज पर्यंत विविध दैनिकात विविध पदावर कार्यरत राहून जबाबदारी पार पाडली आहेत. आंबेडकरी चळवळीतील अनुभवी पत्रकार म्हणूनही महेश गायकवाड परिचित असून त्यांच्या पत्रकारितेतील अनुभावाची दाखल घेत त्यांना विविध सामाजिक संस्थां संघटना आणि पक्ष व नागरिकांनी पारितोषिक देऊन सन्मानित केले आहेत. त्यांच्या पत्रकारितेतील अनुभावाची दखल घेऊन पत्रकार हल्ला विरोधी समितीवर राज्य सरचिटणीस म्हणून झालेली निवड पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांवरील अन्याय आणि हल्ले रोखण्यासाठी निश्चितच सार्थकी ठरेल अशी अशी भावना आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते मंडळींनी तसेच कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button