महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती निमीत्त कोळी समाजात सामाजिक एकोपा – प्रथमेश इंगळे
हसापूर कोळी समाजाच्या वतीने
महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी.
प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी ऋषी यांची आरती.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.०९/१०/२०२५)
रामायण रचिता आद्यकवी कुलगुरू महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमीत्त
कोळी समाजात सामाजिक एकोपा निर्माण झाला असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले. महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार नुकतेच तालुक्यातील हसापूर येथील कोळी समाजाच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्याची आरती प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी प्रथमेश इंगळे बोलत होते. या प्रसंगी कोळी समाजाच्या वतीने प्रथमेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना प्रथमेश इंगळे यांनी हसापूर सारख्या ग्रामीण भागात ऋषीमुनी, युगपुरुष, संत महंतांच्या जयंती निमीत्त विविध समाज एकत्रीत येत असल्याने
हसापूर सारख्या ग्रामीण भागातील सार्वभौमत्वास असे उपक्रम प्रेरक असल्याचे मनोगतही व्यक्त करुन कोळी समाज बांधवांना महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती निमीत्त शुभेच्छा दिल्या. यानंतर कोळी समाज बांधव व हसापूर ग्रामस्थांच्या वतीने
महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्याची हसापूर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हसापूर ग्रामपंचायत सरपंच कामाठी, उपसरपंच गौतम घटकाबळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कामाठी, मीनाबाई शिंदे, कृष्णाबाई सदाफुले, सायनत्राबाई घटकाबळे, माजी सरपंच पाटील, रामलिंगया स्वामी, शीतापती कामाठी, राजकुमार कामाठी, महेश कामाठी, रोहित जाधव आदींसह हसापूरचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमीत्त महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्याच्या आरतीनंतर प्रथमेश इंगळे व अन्य मान्यवर दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!