विद्यार्थ्यांनो, स्पर्धात्मक युग आहे कौशल्य आत्मसात करा यश नक्की मिळेल..कर सल्लागार शुभम चव्हाण
कल्याणशेट्टी महाविद्यालयात कॉमर्स असोसिएशन तर्फे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा
अक्कलकोट
माहिती आणि तंत्रज्ञानामुळे स्पर्धात्मक युग सुरू आहे बेकारी वाढत आहे, बँकांची स्थिती विचित्र झाली आहे, म्हणून वाणिज्य विद्या शाखेतील विद्यार्थ्यांनी आर्थिक विकासाचे कौशल्य आत्मसात करावे यश नक्की मिळते, स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करता येतो असे प्रतिपादन संसाधन व्यक्ती म्हणून प्रख्यात कर सल्लागार शुभम चव्हाण यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करियर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, विभाग प्रमुख प्रा शिल्पा धूमशेट्टी उपस्थित होते.
कार्यशाळेत पुढे बोलताना ते म्हणाले, वाणिज्य पदवीधरांना चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कर सल्लागार, बँक मॅनेजर, इव्हेंट मॅनेजर अशी रोजगाराची संधी उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी मेहनत घ्यावी लागते अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा लागतो, चालू घडामोडी समजून घ्याव्या लागतात, कोर्सेस पूर्ण करावे लागतात त्यामुळे यशाचा मार्ग सुलभ होतो.
मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी अभ्यास करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते, फाउंडेशन परीक्षा पास झाल्यानंतर जिद्दीने चिकाटीने पुढील परीक्षा द्यावी लागते, अत्यंत कठीण मेहनत घेतल्यानंतर यश प्राप्त होते म्हणून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत.
कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन प्रा जनाबाई चौधरी यांनी केले आभार प्रा डॉ बाळासाहेब पाटील यांनी मानले यशस्वीतेसाठी प्रा शितल फुटाणे यांनी प्रयत्न केले.
चौकटीतील मजकूर .
कार्यशाळेत विद्यार्थिनीं कडून प्रश्नाची सरबत्ती
करियर गायडन्स कार्यशाळा प्रसंगी उपस्थित विद्यार्थिनींनी वाणिज्य विद्याशाखेतून पदवीधर झाल्यानंतर कोणते कोर्सेस करावेत, त्यासाठी अभ्यासाची वाटचाल कशी करावी. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी कशी केली पाहिजे असे अनेक प्रश्न सी ए शुभम चव्हाण यांना विचारले. त्याचे त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!