
सोलापूर अक्कलकोट महामार्गावर डेब्रिजचा अडथळा
मुद्रा सनसिटी जवळ ट्राफिक जाम
सोलापुर : सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर मुद्रा सनसिटी जवळील गटारीतील डेब्रिज चा ढीग रस्त्यावर टाकण्यात आला असून गेल्या पंधरा दिवसापासून तसाच आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळच्या सुमारास या भागात ट्राफिक जाम होत आहे.
सप्टेंबर महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पंजवाणी मार्केटमध्ये पाणी तुंबले होते त्यामुळे येथील दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पावसाचे पाणी तुंबण्याचे कारण शोधले असता मुद्रासन सिटी समोरील जवळपास 200 मीटर लांबीची गटार डेब्रिज टाकून बुजविल्याचे दिसून आले.
दोन्ही बाजूच्या गटारीतील डेब्रिज काढण्याचे काम चालू असेल मुद्रा सन सिटी समोरील काढलेले डेब्रिज गेल्या पंधरा दिवसापासून रस्त्यावरच टाकण्यात आले आहे.
यात आणखी कहर म्हणजे रस्त्यावर कुठेही काम चालू असल्याचा फलक लावलेला नाही. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर कोठेही सर्विस रोड असल्याचाही उल्लेख नाही.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोललेल्या आढावा बैठकीला न येणारे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, स्थानिक आमदारांच्या सूचनाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी सर्वसामान्यांसाठी रस्ता मोकळा करतील काय याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.