वागदरी येथील एका एम बी बी एस विद्यार्थांला आमची गुणी मुलं प्रतिष्ठानच्या वतीने १५ हजारची मदत करताना
वागदरी / नागप्पा आष्टगी
लिंगायत हटगर कोष्टी समाजाचे आमची गुणी मुलं प्रतिष्ठान १ मार्च २०२२ रोजी स्थापना झाली,
प्रतिष्ठान ने आज पर्यंत महाराष्ट्र भरातील तळागाळातील ३३ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी जवळपास सात लाख रुपये वाटप केले असल्याचे माहिती प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोक सिनगारे व नागप्पा आष्टगी. यांनी दिली.आज दि.७ रोजी वागदरी येथील अन्नपूर्णा संजय यरगल या विद्यार्थीनीस सलग तिस-या वर्षी १५ हजार रू.ची मदत देण्यात आली.या स्तुत्य व अनुकरणीय उपक्रमाचे राज्यभरातुन कोतुक केले जात आहे.
२०२५ /२०२६ या शैक्षणिक वर्षापासून प्रतिष्ठान ने उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे, महाराष्ट्र भरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या हुशार विद्यार्थ्यांना या उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना अंतर्गत वार्षिक २५,००० रू शिष्यवृत्ती देण्यात आली,
एकूण ४ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली.१) कु अर्पिता गणेश जत्ती जालना एम बी बी एस साठी कै गंगाधर कृष्णात नरखेडकर अनगर उच्च शिक्षण शिष्यवृत्ती २५०००रू
२) कु प्रतिक्षा महेश एतवाडे परंडा बी फार्मसी साठी कै शांताई अण्णाराव उमराणे अंबेजोगाई उच्च शिक्षण शिष्यवृत्ती २५०००३) चि सिद्धार्थ गणेश कोंगे वीटा जि सांगली बी टेक साठी कै गंगाधर माधवराव येळाई अहिल्या नगर उच्च शिक्षण शिष्यवृत्ती२५०००
४) कु सृष्टी दत्तात्रय आंबेकर भाळवणी बी फार्मसी साठी कै कावेरी संदिपान एतवाडे जालना उच्च शिक्षण शिष्यवृत्ती २५००० देण्यात आली.
दरवर्षी जुन महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र भरातील तळागाळातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते ,
तसेच दरवर्षी दिवाळी निमित्त समाजातील निराधार वृद्धांना दिवाळी निमित्त तीन महिने पुरेल इतकं राशन व शक्य असेल त्यांना नवीन कपडे, मिठाई पाठवते.
प्रतिष्ठान ने १२ गरजू उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे, पैकी बहुतांश विद्यार्थ्यांना वडील नाहीत तर बाकीच्या विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करणारे आहेत.
समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आमची गुणी मुलं प्रतिष्ठान चे संस्थापक डॉ अशोक सिनगारे जालना, किरण रोटे पंढरपूर, विनायक उमराणे पुणे, विजय वांगीकर जालना, निवृत्ती रूद्राक्ष जालना, नागनाथ कोंगे पुणे,सौ अनिता ताई ओगले जालना, नागप्पा अष्टांगी वगदरी अक्कलकोट, निलकंठ रेऊरे सर वागदरी व महाराष्ट्र भरातील समाज बांधव प्रयत्न करत आहेत, योगदान देत आहेत.
फोटो विषय -वागदरी येथील एका एम बी बी एस विद्यार्थांला आमची गुणी मुलं प्रतिष्ठानच्या वतीने १५ हजारची मदत करताना
Back to top button
×
No WhatsApp Number Found!