श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सव मंडळाचे आरास स्पर्धेत दुसरे क्रमांक
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.०८/१०/२०२५)
नवरात्र महोत्सव निमित्त येथील एस.जे. बॉईज मित्र मंडळाच्या वतीने आयोजित
करण्यात आलेली भव्य आरास स्पर्धा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. यामध्ये
संजय नगर येथील श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सव मंडळांने यंदाच्या वर्षी सादर केलेला सजीव देखावा विठ्ठलभक्त संत गोरा कुंभार यास व्दितीय (दुसरा) क्रमांकाचे ट्रॉफी बक्षीस वितरण करुन सन्मानित करण्यात आले. विठ्ठलभक्त संत गोरा कुंभार देखाव्यातील कु.राशी गायकवाड, कु.धनुषा गोरे, कु. रोशनी गायकवाड, कु.सायली मेथे, चि.आर्य मेथे, चि.आदर्श भोरे, चि.दत्तश्री गोबरे, चि. देशक्ती गोबरे या बालकलाकारांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सजीव देखाव्याचे उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी मार्गदर्शिका सौंदर्या सिध्दाराम माळी यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे खेडगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.गणपतराव कलशेट्टी, आयोजक शिवराज जकापूरे, सोहेल मटकी, स्वामीनाथ धनशेट्टी, संजय भागानगरे उपस्थित होते.
याप्रसंगी उत्सव अध्यक्ष ईरण्णा गवंडी, उपाध्यक्ष सिध्दाराम माळी, सिध्दाराम गुब्याड, संस्थापक अध्यक्ष बाजीराव जाधव, चंद्रकांत गवंडी, सुर्यकांत बाचके, संतोष माने, अमोल गवंडी, श्रीशैल मामा गवंडी, सुधाकर गायकवाड, विठ्ठल खरात आदींसह मंडळाचे सर्व विश्वस्त पदाधिकारी व देवीजींचे महिला व पुरुष भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – विठ्ठलभक्त संत गोरा कुंभार यास व्दितीय (दुसरा) क्रमांकाचे ट्रॉफी बक्षीस वितरण करुन सन्मानित करतानाचे प्रसंग छायाचित्रात दिसत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!