मेजर नारायण माने यांची सेवापुर्ती प्रित्यर्थ सन्मान पत्र व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
स्विमींग ग्रुप व महेश इंगळे मित्रपरिवारच्या वतीने होणार सन्मान व सत्कार.

सेवापुर्ती सन्मान सोहळ्यास आ.सचिन दादा कल्याणशेट्टी, अमोलराजे भोसले व मान्यवरांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.९/१०/२०२५)
तालुक्यातील दहिटणे गावचे सुपूत्र मेजर नारायण (अमोल) माने हे भारतीय सैन्यदलातून देशातील विविध भागात सलग १७ वर्षे देशसेवा करून नुकतेच सन्मान पुर्वक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या अतुलनीय सेवेची दखल घेत येथील स्विमींग ग्रुप व महेश इंगळे मित्रपरिवारच्या वतीने स्विमींग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि.११ ऑक्टोबर रोजी लोकापूरे हॉल येथे मेजर नारायण (अमोल) माने यांचा सन्मानपत्र देवून सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सेवापुर्ती सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सेवापुर्ती सन्मान व सत्कार सोहळ्यास श्री स्वामी समर्थं अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, मा.उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे,
मा.नगरसेवक मिलन दादा कल्याणशेट्टी, महाराष्ट्र माळी महासंघ तालुका अध्यक्ष संतोष पराणे, आर.पी.आय. तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, दहिटणचे सरपंच नितीन मोरे, उपसरपंच विकी बाबा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत दादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ सिध्दे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, शिंदे गट शिवसेना तालुका अध्यक्ष बाबा पाटील, ठाकरे गट शिवसेना तालुका अध्यक्ष आनंद बुक्कानूरे, शरद पवार गट राष्ट्रवादी अध्यक्ष बंदेनवाज कोरबू यांचीही प्रमुख उपस्थिती
लाभणार आहे.

सन्मान व सत्कार सोहळ्यापुर्वी सकाळी ११ वाजता मेजर माने यांची श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथून लोकापूरे हॉल पर्यंत मिरवणूक निघणार आहे, तरी सर्व स्विमींग ग्रुप सदस्य व मित्रपरिवार सदस्यांसह नागरिकांनी देशसेवेचे कार्य समजून मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन महेश इंगळे यांनी केले आहे.

Back to top button
×
No WhatsApp Number Found!