हालहळ्ळी व बोरी उमरगेतील पुरग्रस्तांना वटवृक्ष देवस्थानच्या माध्यमातून महेश इंगळेंच्या वतीने धान्य कीट वाटप.
नैसर्गिक आपत्ती काळात तहसील प्रशासनास महेश इंगळे यांचे विशेष सहकार्य.

HTML img Tag
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.०८/१०/२०२५)
तालुक्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरग्रस्त परिस्थितीचे संकट प्रशासनासह सर्वासमोरच आवासून उभे ठाकले आहे. शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांपासून विविध सामाजिक संघटना, धार्मिक, सामाजिक, व इतर कार्यान्वित संस्थानी पुरग्रस्त बाधीत कुटूंबांसाठी प्रशासनास सहकार्य म्हणून सर्वानीच पुढाकार घेतला आहे.
या कार्यात अन्य उपक्रमांप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीनेही पुढाकार घेत समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या संकल्पीत नेतृत्वातून व स्वामी प्रसादाच्या माध्यमातून पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
आज महेश इंगळे यांच्या सुचनेनुसार येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी व बोरी उमरगे येथील पुरग्रस्त अतिवृष्टीमध्ये बाधित कुटुंबांना मदत म्हणून गहू, तांदूळ, साखर, रवा, डाळी इत्यादी धान्यांचा समावेश असलेले जवळपास १५० अन्नधान्याचे कीट वाटप करण्याकरीता तालुक्याचे तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सदर अन्नधान्याचे कीट आज
मा.तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे उमरगे व हालहळ्ळी येथे मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थित वाटप करण्यात आले. अतिवृष्टीमुळे आगोदरच खचलेल्या ग्रामस्थांनी या अन्नधान्य कीटमुळे ग्रामस्थांना महेश इंगळे यांच्या सारख्या दैवतासमान व्यक्तीमत्वाच्या माध्यमातून साक्षात श्री स्वामी समर्थांनीच प्रसादरुपी अन्नधान्याची मदत पाठविली असल्याचे मनोगत कांही ग्रामस्थांनी व्यक्त केले. या मदत कार्यात देवस्थानचे सेवेकरी गिरीश पवार, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, ओंकार महाडीक, गणेश इंगळे, समर्थ स्वामी, लखन सुरवसे, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव आदींसह सेवक वर्गाने अत्यंत उत्साहाने परिश्रम घेतले.
फोटो ओळ – हालहळ्ळी व बोरी उमरगेतील पुरग्रस्तांना वटवृक्ष देवस्थानच्या माध्यमातून महेश इंगळेंच्या वतीने धान्य कीट वाटप करताना प्रशासकीय अधिकारी व नागरिक दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!