गावगाथा
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा मदतीचा मोठा हात ; रु. ५० लाखांचे ५ हजार धान्य किट व १ हजार साड्या जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त
या मदतीचा एक भाग म्हणून अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी १ हजार धान्य कीट व २०० साड्या देण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा मदतीचा मोठा हात ; रु. ५० लाखांचे ५ हजार धान्य किट व १ हजार साड्या जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आवाहनास प्रतिसाद देत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटवला आहे.
संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुमारे रु. ५० लाख मूल्याचे ५ हजार जीवनावश्यक धान्य शिधा किट पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी सायंकाळी सुपूर्त करण्यात आले. तसेच अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने संस्थापक अध्यक्षा सौ. अलकाताई जनमेजयराजे भोसले व सचिवा सौ. अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली १ हजार पूरग्रस्त महिलांना साड्या देण्यात आल्या.
या मदतीचा एक भाग म्हणून अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी १ हजार धान्य कीट व २०० साड्या देण्यात आल्या आहेत.
दसऱ्याच्या दिवशी झालेली मोठी घोषणा
विजयादशमीच्या दिवशी अन्नछत्र मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी या मदतीची मोठी घोषणा केली होती. या घोषणेनुसार सोमवारी तहसीलदार विनायक मगर यांच्या उपस्थितीत १२ ट्रक धान्य कीट व साड्या सोलापूरकडे रवाना करण्यात आले. यावेळी ट्रकचे पूजन तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चाराने पूजन विधी संपन्न झाला.
📦 अन्नछत्र मंडळाचे सहकार्य :
पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी अन्नछत्र मंडळाने जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जीवनावश्यक धान्य शिधा किट व वस्त्रसाहित्य जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त केले आहे.
“अक्कलकोट तालुक्यातील गरजूंना १ हजार धान्य कीट व २०० साड्या वितरित करण्यात येतील,”
— विनायक मगर, तहसीलदार, अक्कलकोट