गावगाथा

*सरपंच शिवानंद घोळसगाव यांच्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन*

इफ्तार पार्टी

*सरपंच शिवानंद घोळसगाव यांच्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन*
वागदरी येथे सामाजिक एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी वागदरीचे सरपंच शिवानंद घोळसगाव त्यांच्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सर्व धर्मीय नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती,सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

HTML img Tag Simply Easy Learning    
रमजान हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना असून,या काळात उपवास (रोजा)धरले जातात आणि संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो.समाजात बंधुभाव आणि ऐक्य वाढावे, या उद्देशाने सरपंच शिवानंद घोळसगाव यांनी पुढाकार घेत इफ्तार पार्टीचे आयोजन केले.हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात एकोप्याचे अद्वितीय दृश्य पाहायला मिळाले.

HTML img Tag Simply Easy Learning    
या कार्यक्रमात अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब वागदरी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, माजी पंचायत समिती सदस्य सायबू गायकवाड ,माजी पंचायत समिती सदस्य गुंडप्पा पोमाजी,माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर सोनकवडे, माजी सरपंच परमेश्वर पोमाजी ,सामाजिक कार्यकर्ते शरण सुरवसे, भुरीकवटेचे सामाजिक कार्यकर्ते शाबुद्दीन शेख , नबीसाहेब नदाफ सर ,सिद्धराम कोळी, ग्रामपंचायत सदस्य हनीफ मुल्ला ,बाबुराव जावळकोटी, महेश बंडगर, श्रीशैल ठोंबरे , विजयकुमार निंबाळे, प्रकाश पोमाजी, राम पोमाजी, सुरेश माने, परमेश्वर फुलमाळी विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन इफ्तार केला आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत हिंदू-मुस्लिम ऐक्याची गरज आणि त्याचे महत्त्व यावर भाष्य केले. “धर्म हा जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नाही,” असे सांगत माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे साहेब यांनी सर्वांना सलोख्याचे संदेश दिला.
माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानावडे यांनी बोलताना म्हणाले की, “वागदरी हे गाव ऐक्याचे प्रतीक आहे. येथे सर्वधर्मीय लोक प्रेमाने आणि एकोप्याने राहतात.इफ्तार पार्टीचे आयोजन म्हणजे फक्त धार्मिक सोहळा नसून सामाजिक बंध मजबूत करण्याचा एक प्रयत्न आहे. असे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे,जेणेकरून समाजात प्रेम आणि बंधुत्व कायम राहील.”
या इफ्तार पार्टीत सुमारे शंभर अधिक नागरिक सहभागी झाले होते.खजूर,फळे, फराळाचे पदार्थ आणि शीतपेयांचा यामध्ये समावेश होता.उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि पुढेही असेच उपक्रम सातत्याने व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button