गावगाथा

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिंगे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर

निवड नियुक्ती

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिंगे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर
पुणे : महाराष्ट्र पोलिस मित्र सोशल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार–२०२६ यंदा पुण्यातील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिंगे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सदर पुरस्काराबाबत संस्थेच्या वतीने अधिकृत पत्र देण्यात आले असून पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने हा पुरस्कार दिला जात असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेल्या या पुरस्काराच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्र, शिक्षण, पत्रकारिता, अभियांत्रिकी, कृषी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम धुळे, उपाध्यक्ष बालाप्रसाद सोमाणी तसेच संस्थापक सचिव सुफी सय्यद शमशोदिन यांनी ही माहिती दिली असून चंद्रकांत शिंगे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button