गावगाथा

टाटा पॉवर कडून वळसंग येथे नालासरळीकरण..

आपले वर्ग मित्र, शेतकरी मल्लिनाथ गुमदे यांना नाला सरळी करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्याचा मान डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला.

टाटा पॉवर कडून वळसंग येथे नालासरळीकरण..

वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील जवळपास चार किलोमीटर लांबीच्या नाल्याचे सरळीकरण टाटा पॉवर कम्युनिटी ट्रस्ट यांच्याकडून करण्यात आले. वळसंग गावातील गुडंगा विहीर ते माणकोजी शेत या चार किलोमीटर लांबीच्या नाल्याचे सरळीकरण टाटा पॉवर कम्युनिटी ट्रस्टच्या सीआरएस फंडातून करण्यात आले. यशदाचे उपमहासंचालक व माजी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सातत्याने या नालासरळीकरणासाठी पाठपुरावा केला.
नालासरळीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन येथील शेतकरी मल्लिनाथ गुमदे यांच्या हस्ते डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, टाटा वळसंग युनिटचे हेड दत्तात्रय बस्तापुरे , संवाद तज्ञ सचिन जाधव, माजी सरपंच महादेव होटकर, हुतात्मा जलसंवर्धन समितीचे अध्यक्ष दिनकर नारायणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले . नालासरळीकरणासाठी वळसंगचे सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच समीर कटरे, माजी सरपंच सिद्धाराम कोडले, महादेव होटकर, शिवबसपा खैराटे , पत्रकार अल्ताफ पटेल , अशोक खैराटे , राजकुमार हंजगे , घाळेपा भूसणगी , सादीक पटेल , अशोक तिपरादी , राजकुमार माणकोजी, मल्लिनाथ गुमदे व परिसरातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले. ओढ्याच्या दोन्ही बाजूला बांबू व गजगा या झाडांची लागवड केल्याने दोन्ही बाजूची माती परत ओढ्यात येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी या झाडांची लागवड करावी रोपे मोफत उपलब्ध करून देऊ असे डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. लोकसहभाग वाढवण्यासाठी टाटा सीएसआर विभागाचे अधिकारी विश्वास सोनवले , यशवंत गायकवाड हुतात्मा जलसंवर्धन समितीचे पदाधिकारी विरेश बागलकोटी, सादिक पटेल, रवी कलशेट्टी, अजय काळे ,परशुराम चौगुले, पार्श्वनाथ खोबरे, प्रतिभा दुधगी,निलव्वा जिड्डीमनी, भागीरथी बिराजदार ,कल्पना जाधव यांनी परिश्रम घेतले.
चौकट १
वळसंगच्या आजूबाजूच्या चारही तलावाचे खोलीकरण लोकसहभागातून व जीआर , नाम फाउंडेशन, ग्रामपंचायत वळसंग,स्वामी समर्थ सेवा मंडळ , हुतात्मा जलसंवर्धन समिती यांच्या सहकार्यातून करण्यात आले आहे. या मुख्य ओढ्याचे सरळीकरण मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. टाटा पॉवर कम्युनिटी ट्रस्ट मुंबई यांच्या सीएसआरफंडातून गावातील या ओढ्याचे सरळीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवले जाईल. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होईल. लोकसहभाग वाढविण्यासाठी
– डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी ,उपमहा संचालक ,यशदा पुणे
चौकट २
शेतकरी व नागरिकांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी नालासरळीकरणाचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. आता सोलार प्रकल्पाच्या सपाट जमिनीत जलतारासारखे प्रयोग केल्यास वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरेल त्याचा फायदा भावी पिढ्यांना नक्कीच होईल. झाडे लावण्यासाठी खड्डे मारून तयार ठेवा विविध एनजीओच्या माध्यमातून रोपे उपलब्ध करून देऊ.
दिनकर नारायणकर अध्यक्ष ,हुतात्मा जलसंवर्धन समिती वळसंग
चौकट
आपले वर्ग मित्र, शेतकरी मल्लिनाथ गुमदे यांना नाला सरळी करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्याचा मान डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. वास्तविक राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाते मात्र त्यांनी आज मनाचा मोठेपणा दाखवत मित्राला सन्मान दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button