नाविंदगी येथे 117 वा उर्स-ए-शरीफ उत्साहात साजरा होणार…

अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथे हजरत ख्वाजा पिर यतिमशावली (रह.) यांच्या 117 व्या उर्स-ए-शरीफ निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लिम जमात नाविंदगी व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने हा उर्स सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
उर्स कार्यक्रमाची सुरुवात बुधवार दि. 27 मे 2026 रोजी गुळ कार्यक्रमाने होणार असून, गुरुवार दि. 28 मे रोजी सायंकाळी 7 वाजता संदल (गंध) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हरदेशी-नागेशी निगीपदा कार्यक्रम व लंगर-ए-आम (दासोग महाप्रसाद) आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी कर्नाटक सुप्रसिद्ध गायिका विद्या श्री मरिगणाळ तसेच गायक मौलासाब मुल्ला यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
शनिवार दि. 30 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता जियारत कार्यक्रमाने उर्साची सांगता होणार आहे.
उर्स-ए-शरीफमध्ये सहभागी होऊन फेज हासिल करण्याचे आवाहन उर्स कमिटीने केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!