🛑 *नाभिक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : खासदार प्रणिती शिंदे*
👉 *महाराष्ट्र नाभिक महामंडळ व समाजोन्नती फाउंडेशनतर्फे वधू-वर परिचय मेळावा, व गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

सोलापूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ व समाजोन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वधू-वर परिचय मेळावा, तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व गुणवंत समाजबांधवांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन अचिव्हर्स हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नाभिक समाजाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापुराव अडसूळ, नगरसेवक प्रथमेश कोठे, नाभिक समाज पश्चिम विभागीय अध्यक्ष रमेश राऊत, उद्योगपती नितीन दुर्लेकर, कलबुर्गी अध्यक्ष शरणबसावेश्वर सूर्यवंशी आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “नाभिक समाजाने आपली पारंपरिक व्यवसायाची ओळख जपत आधुनिकतेची कास धरून प्रगती साधली आहे. समाजातील अनेक बांधव विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आपले वेगळे स्थान निर्माण करत आहेत. अशा कर्तृत्ववान समाजबांधवांचा गौरव होत असल्याने नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. नाभिक समाजाच्या कोणत्याही समस्या असतील, त्या सोडविण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे.”
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैभव शेटे, संजय चिकटे, श्रीकांत राऊत, आनंद वाघमारे, संदीप पवार, सुदर्शन विभुते, मनोज डिगे, गणेश वाघमारे, बापुराव काळे, सहदेव वाघमारे, शिवशरण सुरवसे, काकासाहेब वाळके, सुभाष सुरवसे, लक्ष्मण विभुते, अतुल राऊत, सुधीर माने, श्रीशैल विभुते, संदीप राऊत, अनिल विभुते, प्रकाश वाघमारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
Back to top button
×
No WhatsApp Number Found!