गावगाथा

श्री एस.एस.शेळके प्रशालेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

वर्धापन दिन विशेष

श्री एस.एस.शेळके प्रशालेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
वागदरी (प्रतिनिधी) : वागदरी पंचक्रोशीतील ज्ञानगंगा म्हणून ओळख असलेल्या श्री एस. एस. शेळके प्रशालेचा ५९ वा वर्धापन दिन गुरुवार, १२ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. १२ जून १९६७ रोजी स्थापन झालेल्या या शैक्षणिक संस्थेने गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव मल्लप्पा निरोळी (मामा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व संस्थेचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास संस्थेचे माजी चेअरमन मल्लीनाथ शेळके (सावकार), संचालक भाऊराव पाटील, सिद्रामप्पा पाटील, बसवणप्पा ढवणे, गिरीश खुने, मुख्याध्यापिका सौ. राजेश्री शेळके, पर्यवेक्षिका सौ. शैलशिल्पा जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख संतोष हत्ते यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या या संस्थेने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी संस्थेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. वर्धापन दिनानिमित्त शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button