नवी मुंबईत ६ सप्टेंबरला ‘श्रावण संध्या’चे आयोजन
चित्रकला, संगीत खुर्ची, वचन गायन व फॅन्सी ड्रेस स्पर्धांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
नवी मुंबई, दि. २८ : वीरशैव-लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना, महिला व नागरिकांना कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात व्यासपीठ मिळावे, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी (रजि.) यांच्या वतीने ‘श्रावण संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नवी मुंबईतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (मॉडर्न कॉलेज), वाशी फायर ब्रिगेडच्या पाठीमागे, सेक्टर १५ ए, वाशी येथे होणार आहे.
कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, सर्वांसाठी वचन गायन स्पर्धा तसेच मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात येणार आहे.
चित्रकला व संगीत खुर्ची स्पर्धा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शरण संकुलाच्या कॉपरखैरणे येथील कार्यालयात घेण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी दि. ५ सप्टेंबर २०२६ पूर्वी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना रोज पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असून, शिक्षक व गुरुवर्यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पहिल्या दहा लहान मुलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
मुंबई परिसरात राहणाऱ्या वीरशैव-लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सन २०२५-२६ मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आदी परिसरातील विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी संयोजकांशी संपर्क साधावा अथवा sharanasankul@gmail.com या ई-मेलवर माहिती पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक, समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ सहकाररत्न श्री. शंकरराव बोरकर उपस्थित राहणार आहेत. तसेच नाट्यरत्न विदूषी श्रीमती विद्या वेंकटेश्वरन यांच्या ‘नादम्’ या संस्थेचे शिष्यगण नृत्य सादर करणार आहेत.
कार्यक्रमानंतर सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीचे मुख्य विश्वस्त श्री. एस. एम. शिवयोगीमठ, अध्यक्ष श्री. जी. बी. रामलिंगय्या व सचिव सौ. मंजुळा डी. हिरेमठ यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
आनंद गवी – ९८६९३०८३०१
जगदीशअप्पा जी. एच. – ९३२३२८७०६८
सुनील पाटील – ९३२२४०१००८
चंद्रशेखर नंदीकोल स्वामी – ७०२१६२१०४४
Back to top button
×
No WhatsApp Number Found!