गावगाथा

महात्मा बसवेश्वरांचे विचार समाजाला समतेचा मार्ग दाखविणारे — आमदार सचिन कल्याणशेट्टी

समतेचा शिल्पकार महात्मा बसवेश्वर’ पुस्तकाचे नीतू मांडके सभागृहात प्रकाशन

महात्मा बसवेश्वरांचे विचार समाजाला समतेचा मार्ग दाखविणारे — आमदार सचिन कल्याणशेट्टी

‘समतेचा शिल्पकार महात्मा बसवेश्वर’ पुस्तकाचे नीतू मांडके सभागृहात प्रकाशन

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

महात्मा बसवेश्वर यांनी समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा विचार मांडून समाजपरिवर्तनाची नवी दिशा दिली. त्यांचे विचार आजच्या काळातही तितकेच प्रेरणादायी असून समाजाला समतेचा मार्ग दाखविणारे आहेत, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

हार्ट पब्लिकेशनतर्फे प्रकाशित आणि प्रा. सदाशिव माळगे लिखित ‘समतेचा शिल्पकार महात्मा बसवेश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते नीतू मांडके सभागृह, पुणे येथे उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

महात्मा बसवेश्वरांनी समाजातील विषमता, जातिभेद आणि अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेत समतेवर आधारित समाजव्यवस्थेचा पुरस्कार केला. श्रमाला प्रतिष्ठा, मानवाला समान सन्मान आणि प्रत्येकाला न्याय मिळावा, हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे त्यांच्या विचारांचे आजच्या पिढीने आकलन करून ते आचरणात आणणे गरजेचे आहे, असेही आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रा. सदाशिव माळगे यांनी या पुस्तकातून महात्मा बसवेश्वरांच्या जीवनकार्याचा, सामाजिक संघर्षाचा आणि परिवर्तनवादी विचारांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. त्यांच्या विचारांची आजच्या सामाजिक परिस्थितीशी सांगड घालत पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि बसवेश्वर विचारांचे अनुयायी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रा. सदाशिव माळगे यांच्या या वैचारिक लेखनाचे कौतुक करून पुस्तकास शुभेच्छा दिल्या.

‘समतेचा शिल्पकार महात्मा बसवेश्वर’ हे पुस्तक महात्मा बसवेश्वरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे आणि सामाजिक समतेची जाणीव अधिक दृढ करणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button