गावगाथा
PCMC | ‘ईद – ए – मिलाद’ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील प्रमुख रस्ते राहणार बंद

चिंचवड (प्रतिनिधी) दि. २६, ‘ईद -ए-मिलाद’ मिरवणूकीच्या पार्बुश्वभूमीवर बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ ते रात्री १२ शहरातील अनेक मार्गांवर प्रवेशबंदी आणि वाहतूक वळविण्यात येणार आहे.
हे रस्ते राहणार बंद
महावीर चौक, चिंचवड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. नाशिक फाटा, नेहरूनगर चौक, सायन्स पार्क आणि क्रोमा शोरूम परिसरात वाहतूक वळवली जाईल.
निगडीत सेंट्रल चौक–भक्ती-शक्ती चौक, अंकुश चौक, टिळक चौक आणि स्वानंद डेअरी चौक परिसरातील मार्ग आवश्यकतेनुसार बंद होतील.
चिखलीत कृष्णानगर–चेरी चौक, जाधव सरकार–चेरी चौक, चिखली गाव–डायमंड चौक आणि पिंगळे चौक–पाटीलनगर पंप मार्गांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ बदल लागू राहतील.



