चडचणकर ट्रॅव्हल्स हे सोलापूरातील विश्वसनीय नाव – नगरसेवक महेश इंगळे
सोलापूर येथील चडचणकर ट्रॅव्हल्स कार्यालयास नगरसेवक महेश इंगळे
यांची सदिच्छा भेट.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२३/०८/२६)
सोलापूरकरांच्या प्रवासाचा विश्वास म्हणजे चडचणकर ट्रॅव्हल्स असून चडचणकर ट्रॅव्हल्स हे सोलापूरातील विश्वसनीय नाव असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. नुकतच सोलापूर येथील प्रसिद्ध चडचणकर ट्रॅव्हल्स कार्यालयास नगरसेवक महेश इंगळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी चडचणकर ट्रॅव्हल्सच्या वतीने चडचणकर ट्रॅव्हल्सचे मालक मृगेंद्र चडचणकर यांनी नगरसेवक महेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक महेश इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना नगरसेवक महेश इंगळे म्हणाले की, प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी सेवा देण्याचे काम ते अनेक वर्षांपासून करत आहेत.
ग्राहकांशी त्यांचे असलेले आपुलकीचे नाते हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगातही त्यांनी आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.
त्यांच्या कार्यालयातील नियोजन आणि शिस्त वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचा व्यवसाय असाच वाढत राहो अशी प्रार्थना श्री स्वामींच्या चरणी असल्याचे मनोगतही व्यक्त केले.यावेळी महेश मालक इंगळे मित्र परिवारातील प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, श्रीशैल गवंडी, तुषार मोरे, रमेश शिंदे, स्वप्निल गायकवाड, सचिन गजधाने, रमेश पावसे,
काशिनाथ सोलनकर आदींसह चडचणकर ट्रॅव्हल्सचे जगदीश चडचणकर, सोमनाथ चडचणकर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ – सोलापूर येथील चडचणकर ट्रॅव्हल्स कार्यालयात सत्कार स्वीकारताना नगरसेवक महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!