नियोजनबद्ध स्वामींच्या दर्शन व्यवस्थेमुळे वटवृक्ष मंदिराच्या नावलौकिकाचा जगभरात विस्तार – मा.मंत्री जितेंद्र आव्हाड
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व कुटुंबीयांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

नियोजनबद्ध स्वामींच्या दर्शन व्यवस्थेमुळे वटवृक्ष मंदिराच्या नावलौकिकाचा जगभरात विस्तार – मा.मंत्री जितेंद्र आव्हाड

(प्रतिनिधी अक्कलकोट, येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांचे भक्तगण देशभर व जगभरात आहेत.
या पार्श्वभूमीवर स्वामी दर्शनाकरिता अक्कलकोटला पोहोचण्यासाठी दळणवळणाच्या भक्कम व मूलभूत सोयी सुविधा निर्माण झाले असल्याने स्वामी भक्तांची अक्कलकोटला येण्याची संख्या अलीकडील काळात वाढत चाललेली आहे. या येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना सर्वोत्कृष्ट बद्ध नियोजन करून सुलभ स्वामी दर्शनाची संधी भाविकांना कशाप्रकारे उपलब्ध करून देता येईल यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे नेहमीच प्रयत्नशील असतात. हे त्यांच्या स्वामी सेवेतून आम्ही पाहिलेले आहे. भक्ती, सेवा, उपक्रम हा मुलमंत्र जोपासून महेश इंगळे हे नियमितपणे स्वामी सेवेकरिता वेळ व्यतीत करीत असतात. त्यामुळे येथे येणारे सर्व स्वामीभक्त समाधानाने स्वामींचे दर्शन घेऊन माघारी जातात. या आधारे येथील नियोजनबद्ध स्वामी दर्शन व्यवस्थेमुळे वटवृक्ष मंदिराच्या नावलौकिकाचा विस्तार जगभरात झाला असल्याच मनोगत राज्याचे माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी जितेंद्र आव्हाड व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी माजी मंत्री आव्हाड बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शिवराज स्वामी, सर्फराज शेख, रुद्रय्या स्वामी, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व कुटुंबीयांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
