About Us
नमस्कार,सर्वाचे मनस्वी स्वागत आहे
गावगाथा …
ओढ गावाकडंच्या मातीशी
गावगाथा हे वेब पोर्टल आणि युट्युब न्युज चॅनेल संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी,ग्रामीण संस्कृती इतर महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी देणारे न्यूज पोर्टल आहे…
माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी त्याचा गाव त्याच्या मनातून दूर जात नाही. आठवणी, अनुभव, संस्कार, तेथे झालेली शरीर आणि मन यांची घडण यांच्या मिश्रणातून गावाबद्दलची जी ओढ तयार होते ती विलक्षण असते. म्हणूनच माणसाने त्याच्या गावाचे नाव कोठेही निव्वळ वाचले-पाहिले तरी त्याला आनंद होतो. प्रत्येकाचे ते गाव कायमस्वरूपी नोंदले जावे आणि तेथील प्रथा-परंपरा-जत्रा-इतिहास या तऱ्हेची माहिती जगभर सर्वत्र पोचत राहावी.गावगाथा च्या माध्यमातून लिखाण करण्यात येणार आहे.
आपला गाव आणि आपल्या गावाशी निगडित आठवणी आपण कधीही विसरत नाही. आपण कुठेही असो, शहरात वा परदेशात पण आपल्या मातीशी असलेली नाळ कधीच तुटत नाही. अशाच काही गावाकडच्या गोष्टी आणि आठवणी गावगाथा मध्ये वाचणार आहोत..
प्रत्येक व्यक्तीस आपले गाव आणि तेथे बागडलेले आपले बालपण जीवनभर आठवत असते याचे कारण बहुतेक लोकांची नाळ आपल्या जन्मगावास जोडलेली असते.पोटापाण्याच्या उद्योगासाठी गावातून शहरात माणसे स्थलांतरामुळे देहाने जरी शहरात असली तरी त्यांचे मन गावाकडच्या आठवणींत सदैव रमलेले असते.
जाहिरात व आपल्या गावाकडंची माहिती पाठवण्यासाठी संपर्क
संपादक — धोंडपा नंदे
98506 19724