सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती उद्विग्न करणारी, माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता हतबल –स्वामी चौगुले
कार्यकर्त्यांची खंत

सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती उद्विग्न करणारी, माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता हतबल –स्वामी चौगुले

नमस्कार मंडळी मी स्वामी चौगुले समाजकार्य करताना राजकारणाची जोड मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट शहर उपाध्यक्ष म्हणून जवळपास दोन वर्षे मनापासून काम पाहिले विविध कार्यक्रम घेऊन अक्कलकोट सारख्या ठिकाणी पक्ष वाढण्यासाठी मनापासून प्रयत्न केला.त्याला उत्तम यश लाभले यांचं समाधान वाटते.पक्षाने दिलेली जबाबदारी सर्वमान्य मतदार पर्यंत जातं आले.
पण सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहून माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता हतबल झाला आहे.नेमक कुठल्या गटात जायचे हेच कळतं नाही,कुणाला विरोध कारायच व त्यातून काय साध्य करायचे हेच समजेना झालं आहे.समाजसेवक म्हणून कामं करताना राजकारण सत्ताकारण शिवाय कामं किंवा विकास होत नाही पण सध्याची राजकीय घडामोडी उद्विग्न करणारी आहेत. माझ्या सारख्या सर्वसामान्य असंख्य कार्यकर्त्यांची हिचं परिस्थिती आहे. त्याचं कोणीच विचार करत नाही व विचारत घेऊन दखल घेतली जात नाही हे वास्तव आहे
कुठल्या तोंडाने जनतेच्या समोर जायचे, गेलो तर कुठले विचार घेऊन जायचे कारणं राजकारणात वैचारिक भूमिका झपाट्याने बदलत आहेत सत्तेच्या खेळात नितीमत्ता बाजार मांडला आहे. आजची मतदार खूप सूजाण व समजूतदार आहे त्यांना सर्व काही माहीत आहे.राजकीय घडामोडी परीस्थितीचा अभ्यास आहे.
सध्या मी सर्व राजकीय परिस्थिती पाहता तटस्थपणे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे परीस्थिती पाहून निर्णय घेणार आहे तरी माझा निर्णय बदल काय वाटतं नक्कीच सांगा….
मनापासून धन्यवाद

आपलाच हक्काचा माणूस

श्री स्वामी चौगुले, अक्कलकोट
