उत्तम सदाकाळ यांच्या ‘चातक’ कथेस राज्यस्तरीय पुरस्कार
पुणे (प्रतिनिधी) : साहित्य संवेदना प्रस्तुत कथास्तु राज्यस्तरीय कथा स्पर्धेत उत्तम सदाकाळ यांच्या चातक या प्रेमकथेस उत्कृष्ट कथेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.या स्पर्धेत एकूण ४०० कथा आल्या होत्या त्यापैकी ८ उत्कृष्ट कथांची निवड करण्यात आली. रोख रक्कम व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार वितरण सोहळा प्रसिध्द कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या जन्मदिनी म्हणजे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्या जन्म गावी आजरा येथे होणार आहे.
उत्तम सदाकाळ यांच्या चातक कथेत वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची ताकद असून या कथेचा धक्कादायक शेवट वाचकांना मनोमन हेलावून टाकतो.
उत्तम सदाकाळ यांनी आतापर्यंत ८९ पुस्तके लिहिलेली असून त्यांच्या अनेक सामाजिक कथांना,विनोदी कथांना, भयकथांना, बालकथांना यापूर्वी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.तसेच त्यांच्या कथासंग्रहांना, कवितासंग्रहांना अनेक नामांकित साहित्य संस्थाचे पुरस्कार मिळाले आहेत.
इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात उत्तम सदाकाळ यांची ‘पाऊस’ हि कविता समाविष्ट केलेली असून इयत्ता चौथी व पाचवीच्या वर्गासाठी समग्र शिक्षा ग्रंथालय उपक्रमांतर्गत “कमाई” या बालकथासंग्रहाची निवड झाली आहे.
आतापर्यंत ३३ पुरस्कारांनी सन्मानीत झालेल्या उत्तम सदाकाळ यांच्या पुरस्कार यादीत हा ३४ वा पुरस्कार समाविष्ट झाला आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!