वागदरी परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान – पंचनाम्यासाठी ग्रामपंचायतीची मागणी
वागदरी —गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील वागदरी मंडळातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात वागदरी ग्रामपंचायतीतर्फे तहसीलदार अक्कलकोट यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
सरपंच शिवानंद परमेश्वर घोळसंगाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.

यावेळी उपसरपंच पंकज सुतार, ग्रामपंचायत सदस्य श्रीशेल ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य भैरामडगी,घाळय्या मठपती, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शाणप्पा मंगाणे शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
👉 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ पावले उचलून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!