HTML img Tag
कै. वसंत अंबाजी भांगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय साहित्य वाटपाचे आयोजन
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे कै. वसंत अंबाजी भांगे यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री. एस. एस. शेलके प्रशाला, वागदरी येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे शुभारंभ प्रीतमकुमार यादवकर (अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण) यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बसवराज शेलके (चेअरमन, श्री. एस. एस. शेलके प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, वागदरी) भूषवणार आहेत.
कार्यक्रमाला प्रदीप जगताप (मा. सरपंच गोगांव), राजेंद्र टाकणे (पोलीस निरीक्षक अक्कलकोट), बसवराज सोनकांबळे (उद्योजक सोलापूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या उपक्रमाचे आयोजक चंद्रशेखर भांगे (लोकशाही न्यूज) असून, कमलाकर सोनकांबळे (सिद्धार्थ सोशल फाउंडेशन) यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडणार आहे.
📅 दिनांक : ३० ऑगस्ट २०२५
⏰ वेळ : सकाळी ११ वाजता
📍 स्थळ : श्री. एस. एस. शेलके प्रशाला, वागदरी
या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!