Pune missing case : मांजरी बुद्रुक परिसरातून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता ; आढळल्यास संपर्क साधावा, कुटुंबियांचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी): मांजरी बु. परिसरात राहणारे 76 वर्षीय ज्ञानदेव गणपत खरात हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. या संदर्भात त्यांच्या मुलाने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार राहुल खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील ज्ञानदेव गणपत खरात (वय 76 वर्षे, मांजरी बु., पुणे) हे दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता राहत्या घरातून बाहेर पडले. ते त्यांच्या नातवंडांना शाळेतून आणण्यासाठी हिरो मॅस्ट्रो डिलक्स (एमएच 42 एसी 1809) दुचाकीवरून गेले होते. मात्र कोणालाही काही न सांगता ते कोठेतरी निघून गेले व त्यानंतर घरी परतले नाहीत.

नातेवाईक व परिसरात चौकशी करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर मुलगा राहुल खरात यांनी पोलिसांकडे धाव घेतली. हडपसर पोलिसांनी मनुष्य बेपत्ता नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. तरी सदर व्यक्ती कोठेही कोणालाही आढळून आल्यास कृपया सदर 9890133575 भ्रमणध्वनीवर किंवा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये संपर्क करावा.
