गावगाथा

*शेतातील पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : सरपंच सौ. वनिता सुरवसे*

(गोगांव सह वागदरी मंडळात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान )

*शेतातील पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : सरपंच सौ. वनिता सुरवसे*
(गोगांव सह वागदरी मंडळात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान )
अक्कलकोट ( प्रतिनिधी ): अति पाऊसामुळे गोगांव, खेराट, भुरीकवठे, वागदरी सह अनेक गावात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले असून त्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याबाबत तहसीलदार यांनी आदेश द्यावे अशी मागणी गोगांवच्या सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी तहसीलदार,आमदार व जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे.
वागदरी मंडल मध्ये प्रजन मापक यंत्रणा नसल्यामुळे सदर माहिती प्रशासनास कळण्यास उशिरा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील त्यांना मदत मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. यंदा मे महिन्यात पाऊस आल्याने पेरणी लवकर करण्यात आली होती.मध्यंतरी पाऊस गेल्याने पिकाची वाढ खुंटली, परंतु गेल्या वीस पंचवीस दिवसापासून सतत पाऊस चालू असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उडीद, मूग हे पीक काढणीस येऊन देखील पीक शेतकऱ्यांना काढता आले नाही शेतात मोठया प्रमाणात पाणी साचून शेती पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे.सर्व शेतकऱ्यांचे पिके पाणी लागून गेले आहे. सोयाबीन, तूर, या पिकांना पाणी लागून नुकसान झाले आहे.शेताकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून पैसे काढून बी बियाणे, खत आणून पेरणी केली आहे. यावर्षी सोलापूर जिल्हाबँक आणि सोसायट्या नी सुद्धा कर्ज पुरवठा केला नाही,त्यामुळे लोकांकडून घेतलेले कर्ज फेडायचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. जर मदत नाही मिळाली तर शेतकऱ्याकडून येत्या निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील हे प्रशासन आणि सरकारने ध्यानात घ्यायला हवे. यासाठी शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदत त्वरित करावी अशी मागणी सरपंच वनिता सुरवसे यांनी केली आहे.
चौकट
वागदरी मंडल मध्ये मोठे पाऊस होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे वागदरी मंडल मध्ये प्रजन मापक यंत्रणा नसल्याने यांची माहिती प्रशासनास मिळणे अवघड आहे त्यासाठी या मंडल मधील सर्व ग्रामपंचायत यांनी ग्रामसभेत शेतीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबाबत ठराव घेण्यात यावे
कमलाकर सोनकांबळे
उपसरपंच, गोगांव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button