Akkalkot : कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग समाजोपयोगी उपक्रमात अव्वल ; अजय शिंदे यांची कल्याणशेट्टी महाविद्यालयालयातील रा से यो कार्यालयास सदिच्छा भेट

अक्कलकोट (प्रतिनिधी): कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग समाजोपयोगी उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर कार्यक्षेत्रात आघाडीवर असून स्वयंसेवकांनी विशेष श्रमसंस्कार शिबिरात केलेल्या समाजोपयोगी कार्याची नोंद प्रादेशिक विभागाने घेतली आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक अजय शिंदे यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरूबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्य संपर्क अधिकारी डॉ मिलिंद काळे, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे उपस्थित होते.

डॉ मिलिंद काळे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही देशाच्या सामाजिक विकासाची संकल्पना असून सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या महाविद्यालय व स्वयंसेवकाच्या कार्याची नोंद विभागामार्फत घेतली जाते.

प्रारंभी कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी महाविद्यालयातील उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. आभार प्रा डॉ शितल झिंगाडे भस्मे यांनी मानले.
