श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

भारतरत्न लतादीदी मंगेशकर पुण्यस्मरण दिनी अक्कलकोट येथे अन्नछत्र मंडळात श्रद्धांजली व महाप्रसाद वितरण

दिन विशेष

भारतरत्न लतादीदी मंगेशकर पुण्यस्मरण दिनी अक्कलकोट येथे अन्नछत्र मंडळात श्रद्धांजली व महाप्रसाद वितरण
अक्कलकोट (प्रतिनिधी) :भारतरत्न, गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
या पुण्यस्मरण दिनी अन्नछत्र मंडळाकडून संकल्प पूजा संपन्न झाली. त्यानंतर स्वामीभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच श्री स्वामी समर्थांना लघु रुद्राभिषेक करण्यात आला.
भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांचे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराजांवर पुत्रवत प्रेम होते. छत्रपतींच्या घराण्यावर त्यांची अपार श्रद्धा होती. त्या वेळोवेळी अन्नछत्र मंडळास आर्थिक मदत करीत तसेच मार्गदर्शनही करीत असत. स्वामीभक्तांसाठी त्यांनी स्वामीगीतांच्या लाखो सीडी अन्नछत्र मंडळास मोफत दिल्या होत्या. अन्नदान हेच ईश्वरसेवा मानून त्या नेहमी अन्नछत्राच्या कार्यास सहकार्य करत होत्या.
न्यासाच्या परिसरातील शिवसृष्टी व शिवचरित्र धातुशिल्प ही संकल्पनाही लतादीदींचीच होती. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतःच्या मर्सिडीज व शेव्हरलेट या महागड्या गाड्या जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराजांना भेट म्हणून दिल्या होत्या. मंगेशकर कुटुंबीय आणि भोसले घराणे यांच्यात नेहमीच जिव्हाळ्याचे व सुसंवादी संबंध राहिले आहेत.
पं. हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर, मीनाताई मंगेशकर-खडीकर, आशाताई भोसले यांच्याशीही जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांची घनिष्ठ जवळीक आहे. मीनाताई मंगेशकर-खडीकर लिखित ‘मोठी तिची सावली’ या लतादीदींच्या आत्मचरित्रपर ग्रंथात जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा उल्लेख ‘घरातील माणूस’ असा करण्यात आला आहे.
लतादीदींच्या मते, अन्नछत्रात येणारा प्रत्येक स्वामीभक्त हा स्वामींचेच रूप असून त्यांच्या रूपात मिळणारा आशीर्वाद अन्नछत्रासाठी तारक आहे. हीच भावना आजही अन्नछत्र मंडळाच्या कार्यातून जिवंत असल्याचे या पुण्यस्मरण कार्यक्रमातून दिसून आले.
यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्यासह बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, सिद्धाराम कल्याणी, स्वामीनाथ बाबर, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, राजू पवार, लक्ष्मण बिराजदार, संभाजीराव पवार, अनिल बिराजदार, तानाजी पाटील, श्रीनिवास गंवडी, रमेश हेगडे, मल्लिनाथ कोगनुर, मलंग मकानदार, मल्लिकार्जुन गवळी, काशिनाथ वाले, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी आदी सेवेकरी, कर्मचारी व स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button