गावगाथा

स्व. शिवशरण खेडगी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त २०० वृक्षांचे सामुदायिक वृक्षारोपण

सी. बी. खेडगी महाविद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम; 'एक पेड माँ के नाम' अभियानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

स्व. शिवशरण खेडगी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त २०० वृक्षांचे सामुदायिक वृक्षारोपण
सी. बी. खेडगी महाविद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम; ‘एक पेड माँ के नाम’ अभियानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्कलकोट, दि. २१ (प्रतिनिधी) : अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन तथा शिक्षणमहर्षी स्व. शिवशरण खेडगी यांच्या चौथ्या पुण्यस्मरण पंधरवड्यानिमित्त चेअरमन बसलिंगप्पा खेडगी मित्र परिवाराच्या वतीने सी. बी. खेडगी महाविद्यालय परिसरात सुमारे २०० देशी वृक्षांचे सामुदायिक वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे ज्येष्ठ संचालक अॅड. अनिल मंगरुळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी होत्या.
यावेळी श्री. शिवबसव महास्वामीजी, संस्थेच्या उपाध्यक्षा भारतीताई खेडगी, चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, संचालक चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, पवित्रा खेडगी, ज्योती धरणे, माजी प्राचार्य एम. ए. शेख, प्रभारी प्राचार्य डॉ. अंकुश शिंदे, उपप्राचार्या प्रा. वैदेही वैद्य, पर्यवेक्षक प्रा. निलप्पा भरमशेट्टी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सिद्धार्थ मुरूमकर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. सिद्धार्थ मुरूमकर यांनी वृक्षारोपण मोहिमेची माहिती देताना करंज, बाहवा, चिंच, आंबा, मळकेरी, अशोक, भेंडा, वाळवा आणि कांचन आदी देशी प्रजातींच्या सुमारे २०० वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात शोभाताई खेडगी यांनी महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. तसेच इको क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रमही राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सिद्धार्थ मुरूमकर, डॉ. गीता हारकुड, डॉ. मधुरा गुरव, प्रा. शैला गिरी, प्रा. सुवर्णा जाधव, राजू राठोड, विजयकुमार यारोळे, विजयकुमार राठोड तसेच एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
“प्रत्येक वृक्ष हा पर्यावरणाचा अमूल्य ठेवा”
स्व. शिवशरण खेडगी यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासली. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त लावलेले प्रत्येक झाड हे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे असून भावी पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहे.
— अॅड. अनिल मंगरुळे
ज्येष्ठ संचालक, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button