गावगाथा

उद्या रविवारी श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिराचे आयोजन

श्री.वटवृक्ष देवस्थान व डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार होमिओपॅथिक शिबीर.

उद्या रविवारी श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिराचे आयोजन
श्री.वटवृक्ष देवस्थान व डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार होमिओपॅथिक शिबीर.
(श्रीशैल गवंडी, दि.१८/०७/२६ अ.कोट)
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलीत मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात २० वर्षांखालील दिव्यांग रुग्ण मुलांसाठी
होमिओपॅथिक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री.वटवृक्ष देवस्थान व डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ८ ते १२ यावेळेत होमिओपॅथिक शिबीर संपन्न होईल.
या होमिओपॅथिक शिबिरात डॉ.प्रफुल्ल विजयकर व वैद्यकीय पथकाच्या वतीने २० वर्षांखालील दिव्यांग मुलांची शारिरीक, मानसिक, बौद्धीक तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे, तरी गरजू दिव्यांग मुलांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व डॉ.प्रफुल्ल विजयकर यांनी केले आहे.
यावेळी बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की दिव्यांग मुलांसाठी देवस्थानच्या वतीने अशा प्रकारचे होमिओपॅथिक शिबिरे नेहमीच भरविले जातात. वेळोवेळी तालुक्यातील अनेक दिव्यांग मुलांनी या शिबिरांचा लाभ घेऊन दिव्यांगत्वावर मात केलेले आहे व नैसर्गिक जीवन जगत आहेत. त्यामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक उपक्रमासोबतच आरोग्य शिबिरे राबविण्याचे उपक्रमही वारंवार राबविले जातात, याचे कारण असे की रुग्णसेवा हीच स्वामी सेवा समजून या आरोग्य शिबिरांचे उपक्रम राबविले जात असल्याचे महेश इंगळे यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button