Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी धावणार दोन विशेष रेल्वे गाड्या

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे दि. २२.०७.२०२६ ते २९.०७.२०२६ या कालावधीत भरणाऱ्या आषाढी यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे पंढरपूरसाठी ०२ आषाढी विशेष गाड्या धावणार आहेत.
याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:
दादर-पंढरपूर-दादर विशेष गाड्या (२ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१०४५ विशेष ट्रेन दि. २४.७.२०२६ रोजी १२:५० वाजता दादरहून सुटेल आणि त्याच दिवशी २१:१५ वाजता पंढरपूरला पोहोचेल. (१ फेरी)
गाडी क्रमांक ०१०४६ विशेष ट्रेन दि. २६.७.२०२६ रोजी ००:१५ वाजता पंढरपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी ११:४५ वाजता दादरला पोहोचेल. (१ फेरी)
याच स्थानकावर थांबतील गाड्या 👇
ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डूवाडी.
डब्यांची रचना (कंपोझिशन): दोन एसी-३ टायर, १० स्लीपर क्लास (शयनयान वर्ग), ४ जनरल सेकंड क्लास (सामान्य द्वितीय श्रेणी) आणि २ सेकंड सीटिंग कम गार्ड्स ब्रेक वॅन.
आरक्षण: आषाढी विशेष गाडी क्रमांक ०१०४५ आणि ०१०४६ चे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
आषाढी यात्रेदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार आणखी अतिरिक्त विशेष गाड्या चालवल्या जातील.
तिकीट बुकिंगसाठी प्रवासी ‘RailOne’ ॲप देखील डाउनलोड करू शकतात.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा ‘NTES’ ॲप डाउनलोड करा. असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.



