*वैभव करमल यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेस पिण्याच्या पाण्याची टाकी भेट*
सामाजिक बांधिलकी

*वैभव करमल यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेस पिण्याच्या पाण्याची टाकी भेट*

अक्कलकोट (प्रतिनिधी) मौजे तळेवाड ता. अक्कलकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या वैभव महादेव करमल याच्या ९ व्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च न करता जिल्हा परिषद शाळेस सिमेंटचे पाण्याची टाकी भेट दिली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील,दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक इरण्णा दसाडे, गितांजली शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव करवीर, माजी सरपंच सिध्दप्पा कोटी,उपसरपंच म्हाळप्पा हिळ्ळी, ग्रामपंचायत सदस्य धर्मण्णा कोटी, सोसायटी चेअरमन शावरेप्पा करमल, तंटामुक्त अध्यक्ष बिरप्पा कोटी आदी उपस्थित होते. प्रारंभी भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेञे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, याप्रसंगी रासपचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर उपस्थित होते. चि. वैभव याचा वाढदिवस शाळेच्या पटांगणात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर म्हणाले की वैभव करमल याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे वडील महादेव करमल यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च न करता यापुर्वी लेझीम, प्लास्टिक पाण्याची टाकी, शाळेला लोखंडी गेट, विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आदी भेट देऊन एक आगळावेगळा उपक्रम राबवून साजरा करतात त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत बंडगर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैदप्पा कोळी सर यांनी तर आभारप्रदर्शन महादेव करमल यांनी केले.
