*सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक अक्कलकोट शाखेचा 45 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा व्यवस्थापक रोहन वर्दा, विठ्ठल सोनवणे, राजेंद्र कोळी, स्वप्नील भोगडे, तिरुपती गवंडी, चनवीर बिराजदार, वैजनाथ हळगोदे व लक्ष्मी बगले आदिनी परिश्रम घेतले.

*सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक अक्कलकोट शाखेचा 45 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अक्कलकोट, दि. २३- येथील कारंजा चौक मधील नामांकित सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बॅंकेच्या अक्कलकोट शाखेचा ४५ वा वर्धापन दिन ग्राहक मेळाव्या द्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेच्या सभासदांना बँकेच्या सुवर्ण महोत्सव प्रितर्थ श्री सिद्धरामेश्वरांची रजत मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ग्राहकांना बँकेच्या कार लोन अंतर्गत कार ची चावी प्रदान करण्यात आली.

सभासदांचा बँकेवर असलेल्या विश्वासाने बँक सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करीत आहे तर अक्कलकोट शाखा 45 वे वर्षे. ग्राहकभिमुख सेवेमुळे बँकेने बँकिंग विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ठेवीदार, सभासद आणि प्रामाणिक कर्जदार यांच्या सहकार्याने आजवर सुरू असलेली यशस्वी वाटचाल या पुढे कायम राहील असे प्रतिपादन बँकेचे उपाध्यक्ष नरेंद्र गंभीरे यांनी केले. ग्राहक मेळाव्यात ग्राहक व सभासदांना बँकेच्या आकर्षक ठेव व कर्ज योजनेची माहिती देण्यात आली व योजनाचा लाभ घेण्यासाठी सांगितले.

या कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष नरेंद्र गंभीरे, संचालक शिवानंद कोनापुरे, महेश सिंदगी, सिद्धेश्वर मुनाळे, बसवलिंग खेडगी, महेश हिंदोळे, यशवंत धोंगडे,आशपाक बळोरगी, स्वामींनाथ हिप्परगी, शिवलिंग स्वामी, श्रीशैल घिवारे, राजू नागुरे, राजशेखर हिप्परगी, विजयकुमार कापसे, महालिंगप्पा परमशेट्टी, प्रमोद लोकापूरे, प्रशांत लोकापूरे, महेश नांदगावकर, महादेव डोंगरे, चार्टर्ड अकाऊंटट ओंकारेश्वर उटगे, अँड राजशेखर पाटील, बसवराज माशाळे, दत्तकुमार साखरे, प्रितेश किलजे तसेच ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा व्यवस्थापक रोहन वर्दा, विठ्ठल सोनवणे, राजेंद्र कोळी, स्वप्नील भोगडे, तिरुपती गवंडी, चनवीर बिराजदार, वैजनाथ हळगोदे व लक्ष्मी बगले आदिनी परिश्रम घेतले.