महेश इंगळे हे वटवृक्ष मंदिरातील अमुलाग्र बदलाचे श्रेयकरी – गौतम सोनवणे
गौतम सोनवणे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

महेश इंगळे हे वटवृक्ष मंदिरातील अमुलाग्र बदलाचे श्रेयकरी – गौतम सोनवणे

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२४/२/२४)

येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज अनेक वर्षांनी येण्याचा योग आला. मंदिरात आल्यानंतर विविध सुशोभीकरण, स्वच्छ परिसर, नयनरम्य गाभारा, सुंदर स्वामींची मूर्ती हे सर्व पाहून मन अगदी प्रसन्न होवून भारावून गेले. या मंदिरातील झालेल्या अमुलाग्र बदलाचे श्रेय मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनाच द्यावे लागेल, त्यामुळे त्याचे सर्वतोपरी श्रेयकरी महेश इंगळेच आहेत असे मनोगत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी गौतम सोनवणे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी सोनवणे बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, आर.पी.आय.तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – गौतम सोनवणे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
