गावगाथा

वटवृक्ष मंदीरात माणुसकी फाऊंडेशन दिनदर्शिकेचे महेश इंगळेंच्या हस्ते प्रकाशन

वटवृक्ष मंदिरात माणुसकी फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना महेश इंगळे, आत्माराम घाटगे, महेश गोगी व अन्य दिसत आहेत.

वटवृक्ष मंदीरात माणुसकी फाऊंडेशन दिनदर्शिकेचे महेश इंगळेंच्या हस्ते प्रकाशन

HTML img Tag Simply Easy Learning    

माणुसकी फाऊंडेशन अक्कलकोट दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे दुसरे वर्ष

HTML img Tag Simply Easy Learning    

वटवृक्ष मंदिरात महेश इंगळेंच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२७/१२/२३) –
येथील माणुसकी फाऊंडेशन ही संघटना अत्यंत तळमळीने कार्य करणारी संघटना आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी माणुसकी फाऊंडेशनच्या माध्यमातून दिवाळीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा, रस्त्यावरील निराधार यांना हिवाळ्यात माणुसकीची उब म्हणून मायेच्या वस्त्राचे अच्छादन, गोरगरिबाच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप, दिवाळी फराळ वाटप, कोविड लॉकडाऊन काळात अन्नदान, पूरग्रस्त परिस्थितीमध्ये अन्नदान, मदत कार्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत कार्य, इत्यादी उपक्रम अगदी उत्साहाने या फाउंडेशन कडून राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ अनेक निराधारांना गोरगरिबांना झालेला आहे. या संस्थेचे सर्व सदस्य कोणीही बेरोजगार नसून सर्व स्वयंसेवक आपले व्यवसाय व नोकरी सांभाळून या माणुसकी फाऊंडेशनचे कार्य अगदी उत्साहाने करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज नूतन वर्षाची भेट म्हणून सन २०२४ या नुतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करून माणुसकी फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी ही जोपासलेली असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. नुकतेच आज माणुसकी फाउंडेशनच्या वतीने निर्मिती केलेले सन २०२४ च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, माणुसकी फाउंडेशनचे आकाश शिंदे, आशिष हुंबे, अनंत क्षीरसागर, अविनाश क्षीरसागर, देविदास गवंडी, श्री गुरव, महिंद्रकर, आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – वटवृक्ष मंदिरात माणुसकी फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना महेश इंगळे, आत्माराम घाटगे, महेश गोगी व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button